गंगापूर धरण ९३ टक्के भरले; कोणत्याही क्षणी विसर्ग

नाशिक । नाशिककरांची तहान भागविणारे गंगापूर धरण ९३ टक्के भरले आहे. त्र्यंबकेश्वर व गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर आहे. हवामान खात्यानेही जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. ते बघता गंगापूर धरणातून कोणत्याही क्षणी विसर्ग केला जाऊ शकतो. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अलर्ट मोडवर असून तत्काळ गोदा काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला जाईल.

यंदाच्या हंगामात गोदावरीला एकही पूर आला नाहि. जून व जुलै महिना जवळपास कोरडे गेले. पावसाने पाठ फिरवल्याने गंगापूर धरण जेमतेम ५० टक्के भरले होते. त्यामुळे ऐन पावसाळ्यात नाशिककरांवर पाणी कपात संकटाची टांगती तलवार होती. मात्र वरुणराजाने आॅगस्ट महिन्यात नाशिकवर आभाळमाया केली.

गंगापूर धरणाचे पाणलोट क्षेत्र असलेल्या अंबोली घाटात जोरदार पाऊस झाला. त्रंबकलाही पावसाच्या दमदार सरी कोसळत आहे. त्यामुळे धरणाच्या जलसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. धरण ९३ टक्के इतके भरले आहे. हवामान खात्याने पुढील तीन चार दिवस जोरदार पाऊस पडेल असा इशारा दिला आहे. त्यामुळे पावसाचा जोर वाढल्यास धरण ९३ टक्के भरले असल्याने त्यातून कधीही विसर्ग केला जाऊ शकतो.

परीणामी गोदेची पाणी पातळी वाढली तर नदीकाठचा परिसर पाण्यात जाण्याची शक्यता आहे. ते बघता जिवित व वित्त हानी टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज असून सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. पाणी सोडल्यास यंदाच्या चालू हंगामातील हा गंगापूर धरणातील पहिला विसर्ग ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *