हैदराबादमध्ये जे घडलं ते अत्यंत चुकीचं आहे- मनेका गांधी

दिल्ली| भाजप खासदार मनेका गांधी यांनी हैदराबाद चकमकीवर प्रतिक्रिया दिली आहे. हा अत्यंत भयानक प्रकार आहे. तुम्ही कायदा हातात घेऊ शकत नाहीत, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. या घटनेवर त्यांच्यासोबतच अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

जे घडलं त्यामुळे हैदराबादमधील जनतेमध्ये आनंदाचे आणि समाधानकारक वातावण आहे. देशातील जनतेचा न्याय व्यवस्थेवरील विश्वास उडत चालला आहे. याबद्धल चिंता वाटते. आपण सर्वांनी न्यायव्यवस्था मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. ज्यामुळे लोकांचा पुन्हा न्यायव्यवस्थेवर विश्वास बसेल आणि पिडितांना न्याय मिळेल, असं मत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केलं आहे.

हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी पोलीस चकमकीत ठार झाले आहेत. पोलिसांनी तपासासाठी आरोपींना घटनास्थळी नेलं असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार करत ठार केलं.

पोलिसांनी केलेल्या चकमकीनंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असून काहीजण पोलिसांच्या कारवाईचं कौतुक करत आहेत. तर काहीजण पोलिसांच्या या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *