लोकसभा, विधनसभेबाबत सातारकरांचे कुतुहल?

23 मे ला लोकसभेचा निकाल लागला. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून उदयनराजे भोसले हे निवडून आले. गुलालही उधळला गेला. पण तो आनंद केवळ 100 दिवसांपूरताच उरला. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीच्या तळागाळतल्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या श्रमाचे, केलेल्या मतदानाची बोटावरची शाईही सुकली नाही तोच खासदारकीचा राजीनामा उदयनराजेंनी दिला गेला. त्यामुळे आजच्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत सातारा लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर होते की काय?, विधनसभेबरोबर लोकसभेची निवडणूक लागते की काय असे कुतुहल सर्वच साताकर मतदारांमध्ये विशेष करुन उदयनराजे समर्थकांमध्ये निर्माण झाले होते.

उदयनराजे भोसले यांच्याबाबतीत अगोदरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी होती. त्यांच्या वाढदिवसाला जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलवले होते. तेव्हाच राष्ट्रवादीच्या आमदारांनी नाराजी व्यक्त केली होती. शरद पवार हे सोहळय़ाला गेले होते. परंतु त्यांनीही हारातून माळ काढून घेतली. तेव्हाच उदयनराजे हे भाजपात जाणार अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र, उठलेले वादळ लगेच थांबले. शरद पवारांनी त्यांना तिकीट दिली अन् लोकसभेच्या रिंगणात राष्ट्रवादीतून त्यांना तिकीट दिले होते. महायुतीचे नरेंद्र पाटील हे सेनेच्या तिकीटावर त्यांच्या विरोधत उभे होते. दोघांमध्ये चांगली लढत होवून 23 मे ला निकाल लागला. त्यामध्ये सुमारे सव्वा लाख मतांनी उदयनराजे हे विजयी झाले. परंतु त्या निवडणूकीच्या निकालानंतर जो जोश त्यांच्यामध्ये दिसत नव्हता. मताधिक्क घटल्याने त्यांनी सुरुवातीला ईव्हीएम मशिनवर पत्रकार परिषदा घेवून आपली कैफियत व्यक्त केली होती. भाजपावर आरोप केले होते. एकटय़ानेच रान उठवले होते. पुन्हा त्यांनी जिह्यात आलेल्या शिवस्वराज्य यात्रेकडे न फिरकता आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली. कार्यकर्त्यांनी त्यांना भाजपमध्ये चलाचा अगोदर विनंती केली. त्यांनी अखेर 14 सप्टेंबरला खासदारकीचा राजीनामा दिला. खासदार उदयनराजे प्रेमींना लोकसभा आणि विधनसभा या दोन्हीही निवडणूका एकत्र लागतील, अशी शक्यता वाटत होती. परंतु निवडणूक आयोगाने सातारा लोकसभा पोटनिवडणूकीबाबत काही सांगितले गेले नाही. त्यामुळे नेमकी लोकसभेची निवडणूक कधी होणार?, विधनसभेसोबत होणार की नंतर लोकसभेच काय झाले अशी विचारणा जिह्यातील कार्यकर्ते, उदयनराजे समर्थक यांच्या कुतुहल निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *